१) मार्केट रिसर्च : गेले वर्षभर आम्ही रिसर्च करीत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून विवाहसंस्था, कार्यकर्ते, व्यक्ती, समाज शास्त्रज्ञ, अभ्यासक, कुटुंब, न्याय प्रक्रियेमधील तज्ञ तसेच विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिक यांना भेटून आम्ही त्या संदर्भात माहिती घेतली. हे संशोधन करीत असताना एक गंभीर बाब आम्हाला आढळली, ती आज मी या लेखात मांडत आहे.
२) मुलींचा भ्रमनिरास : बर्‍याच वेळा विवाह झाल्यानंतर वधू व तिच्या पालकांचा भ्रमनिरास झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली. लग्न ठरवताना वरपक्षाकडून दाखवलेली श्रीमंती, संपत्ती व वातावरण यांचा कृत्रिमरित्या देखावा किंवा बनाव केला जातो; परंतु विवाह झाल्यानंतर तसे काहीच नसल्याचे व आपली फार मोठी फसवणूक झाल्याचे कळून चुकते. म्हणजे ज्या अपेक्षेने विवाह केला त्या भंग झाल्या व खूप मोठा भ्रमनिरास झाला, हे विवाह झाल्यानंतर समजते. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे व आश्चर्यकारक बाब म्हणजे समाजात त्याचे प्रमाण अधिक असल्याचेही आम्हाला आढळून आले.
३) रंगरंगोटी : अशा प्रकरणांमध्ये विवाह ठरवण्याआधी वरपक्षाकडे आपल्या गरीबीवर श्रीमंतीचा मेक-अप करण्याची तयारी सुरू होते. अचानक घराला रंगरंगोटी करणे, घरात आकर्षक टाईल्स बसविणे. असे प्रकार चालू होतात. काही ठिकाणी तर असे दिसते की खाली महाग टाईल्स तर दिसतात; परंतु छप्पराकडे पाहिले तर पत्रे लावलेले असतात. वर्‍हांडा चांगला बनविला जातो. तुळशी कट्ट्याची रंगरंगोटी केली जाते. नाहीतर इतरवेळी तीच तुळस कुठेतरी धुळखात असते. अशाप्रकारे संपूर्ण घराचा कायापालट असा केला जातो की, ते कुण्यातरी गर्भश्रीमंत, प्रतिष्ठित माणसाचे घर वाटावे. आपल्या नालायक मुलाचे लग्न ठरावे यासाठी अचानक जाणीवपूर्वक असे केले जाते.
४) अचानक मुंबई- पुण्यामध्ये फेर्‍या : गावाहून अनेक जण मुंबई, पुणे यांसारख्या शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक होतात. शहरात त्यांना बर्‍यापैकी उत्पन्न कमावता येते. कित्येक दशके शहरात राहिल्यामुळे त्यांची मुले सहसा गावाकडे फिरकलेली नसतात; परंतु त्यांच्या लग्नाचे वय झाले की, त्यांचे नातेवाईक व पालक त्यांना घेऊन गावात फेर्‍या मारायला सुरुवात करतात. गावाच्या जत्रेला, यात्रेला जाणे, गावातल्या कार्यक्रमांना व समारंभांना आवर्जून उपस्थित राहणे असे प्रकार सुरू करतात. गावात राहणारेही काहीवेळा टोमणे मारतात, "१०-२० वर्षात कधी गावाकडे यांनी ढुंकूनही पाहिलं नाही आणि आता मुलं लग्नाची झाली म्हणून आता गाव दिसले का?" परंतु आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे इतकी वर्ष शहरात राहूनही त्यांना लग्नासाठी शहरातल्या मुली का मिळू नयेत? लग्नासाठी मुलगी मिळविण्यासाठी यांना गावाचा रस्ता का धरावा लागतो? ही विचार करण्याची बाब आहे.
५) कार घेणे : गावात एखाद्याकडे टू-व्हीलर असणे हे आता सामान्य झाले आहे, गावात पुष्कळ लोकांजवळ स्कूटर/मोटारसायकल असते. परंतु कार खूप कमी लोकांजवळ असते. ज्यांच्याकडे कार आहे त्याला ग्रामीण भागात प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे मुलाचे लग्न ठरवण्याआधी अचानक एखादी कार घेतली जाते; मग ती सेकंड हँड कार का असेना? तिचा फार वापर असो वा नसो, परंतु केवळ दिखावा करण्यासाठी तिला दारात उभी केली जाते. तिचा वापर आभासी श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी केला जातो.
६) ब्रॅंडेड वागणं : लग्नाचे वय झाले असताना किंवा लग्न ठरवण्याच्या काही दिवस आधी मुलाच्या वागण्यात अचानक बदल होतो. अचानक ब्रॅंडेड कपडे-घड्याळ-बूट घालणे, सोशलमीडियावर स्वत:चे फोटो अपलोड करणे अशा प्रकारे अचानकपणे तो ब्रॅंडेड वागू लागतो. ही गोष्ट प्रकर्षाने आमच्या लक्षात आली.
७) आमंत्रणे व चहापान : लग्न ठरण्याआधी इतर वेळी कधीही नातेवाईक, मित्रमंडळी, पै-पाहुणे यांना चहापाणी करण्याची कधीच प्रवृत्ती नसणारे लोक अचानक चहापाणी करू लागतात म्हणजे अचानक सर्वांशी गोड वागू लागतात.
८) पुण्या-मुंबईला तात्पुरती नोकरी : मुलीच्या घरच्याकडून मुलाला चांगली नोकरी असावी, ही एक किमान अपेक्षा असते. त्यामुळे लग्न ठरवायचे आहे म्हटल्यानंतर किंवा तशी तयारी करताना मुलांची शैक्षणिक पात्रता व कौशल्य असो वा नसो, त्याला तात्पुरता काळासाठी का होईना, पुण्या-मुंबईला पाठवले जाते. तिथे एखाद्या थातुर-मातुर कंपनीत कामाला चिकटवले जाते. मग आपला मुलगा शहरात नोकरी करतो, असे सांगत गावाकडे स्थळ बघायला सुरुवात करतात. पोरगा शहरात चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, चांगला पगार आहे, अशा भूलथापा देऊन मुलींना व पालकांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात.
मला काय वाटते ?
१) हे मार्केटींग नव्हे : एखादे उत्पादन वस्तू किंवा प्रॉपर्टी विकण्यासाठी त्याचे पॅकेजिंग केले जाते, रंगरंगोटी केली जाते, त्याला एक चांगला लुक दिला जातो, एखादे शोरूम कसं सजवलं जातं; तसंच मुलाचं लग्न ठरवताना देखील मार्केटींग केलं जातं, ज्यामध्ये मुलगा हा प्रॉडक्ट असतो व घर हे शोरूम असतं. खरे तर विवाह म्हणजे दोन वेगवेगळ्या कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी मधून एकत्र आलेल्या दोन व्यक्तीचे जीवन व्यतीत करण्याचा सहसंबध निर्माण करणे होय. माझ्या नजरेत विवाह म्हणजे वर-वधू या दोन व्यक्तींमधील आयुष्यभराची भागीदारी व मैत्री आहे. त्यात एकमेकांच्या सुखासाठी, भरभराटीसाठी, पूर्णत्वासाठी आवश्यक प्रेम, सहयोग, निस्वार्थ त्याग, सेवा अशा सद्गुणांची आवश्यकता असते. आपल्या संस्कृतीमध्ये विवाह हे पवित्र बंधन समजले जाते, त्यामुळे हे मार्केटींग नव्हे हे समजून घेतले पाहिजे.
२) आपण कुणाला फसवतोय ? : जिच्यासोबत आपल्याला आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचे आहे, जिला आपण आपली अर्धांगींनी म्हणून सन्मान देणार आहोत, तिलाच आपण आपण फसवतोय किंवा विवाहामुळे दोन व्यक्तींचेच नव्हे तर दोन कुटुंबे व त्यांचे नातेवाईक जोडले जात आहेत, त्यानांच आपण फसवतोय, याची जाणीव झाली पाहिजे. ही सदविवेक बुध्दीला न पटणारी गोष्ट आहे.
३) श्रीमंत व्हावं वाटतंय तर मग खरंच का होऊ नये ? : आपले सुंदर घर असावे, आपली वेशभूषा, पेहराव, उत्तम असावा, घरी वैभव असावे, घरासमोर कार उभी असावी, समाजात प्रतिष्ठा असावी, घरी इतर प्रतिष्ठातांची ये उठ बस व्हावी, असं जर वाटत असेल तर खरंच स्वत:मध्ये कौशल्य निर्माण करून, उद्योग-व्यवसाय करून आपण पैसे का कमवत नाही. उगाच श्रीमंतीचा खोटा देखावा करून किंवा आभासी श्रीमंती दाखवण्याचा इतका खटाटोप करण्यापेक्षा खरंच कष्ट करून श्रीमंत होण्यात काय वाईट आहे?
४) माझं लग्न झालं तेव्हा : माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, माझं लग्न ठरलं तेव्हा माझं मासिक वेतन केवळ पाच हजार रुपये होतं. माझ्याकडे कुठलीही कार, मोटरसायकल नव्हती... फक्त एक सायकल होती. मी स्वत: आभासी संपत्तीचा बनावट देखावा करण्याच्या मताचा नाही. जो आभासी श्रीमंती निर्माण करतो तो खरा कधीच श्रीमंत होत नाही. जो खरा श्रीमंत असतो तो कधीच देखावा करीत नाही. बिल गेट, सुंदर पिचाई, मार्क झुकेम्बर्ग यांच्या सारख्या कंपन्यांच्या CEOs ना तुम्ही गळ्यात वीस तोळ्याची चैन घालताना पहिले आहे का?
तुम्हाला या गंभीर मुद्द्यांबद्दल काय वाटतं ? : एक विवाह संस्था किंवा त्यासंबधी समाजात निर्माण झालेले प्रश्न आणि समाजातील लोकांचे याबाबतीत बेजबाबदार गैरवर्तन ही कारणे आहेत, समाजातील विवाह संस्था बदनाम होण्यामागे यामध्ये बदल हा झालाच पाहिजे. प्रिय वाचक मित्रहो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबाबत तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला खाली दिलेल्या कमेंटबॉक्समध्ये जरूर नोंदवा, तुमची मतं इतरांना सुध्दा फायद्याची ठरतील.
लेखक: डॉ. प्रकाश भोसले
आम्ही तुम्हाला तुमचा आदर्श जोडीदार शोधण्यात सहाय्य करू. आम्ही संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने व आधुनिक विचारसरणीवर आधारित विवाह जुळविणारी संस्था आहोत. पदवीधर, उच्चशिक्षित, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक यांसाठी आमच्याकडे आहेत मराठा समाजातील हजारो विवाहयोग्य स्थळे आणि योग्य जोडीदार शोधण्याची खात्री !

 

✅ मराठा समाजातील नोंदणीकृत विश्वसनीय विवाह संस्था

✅ 3500 हून अधिक यशस्वी लग्न जुळवलेत

✅ संपूर्ण महाराष्ट्रातून स्थळे

✅ आपल्या सोयीप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन जुळणीची सुविधा

✅ आपल्या आवडी-निवडींच्या आधारे जोडीदारांची निवड

✅ सर्वांसाठी आकर्षक पॅकेजेस

✅ काऊन्सेलिंग सेवा

 

तुमच्या स्वप्नातील जोडीदाराची निवड करा, आणि सुंदर भविष्याची सुरुवात करा !

????नोंदणीसाठी आजच संपर्क करा:

मराठा सोयरीक संस्था

???? संपर्क कार्यालय : वैष्णवी कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, जगदंब क्लॉथ समोर, पाईपलाईन रोड. अहिल्यानगर (अ.नगर )- ४१४००१

संपर्क: 7447785910, 8847724680

???? पुणे शाखा : कान्हूर पठार पतसंस्थेच्या वर, पुणे-नगर हायवे टच, चंदननगर, पुणे.

संपर्क क्रमांक: ???? 7020281282

???? वेबसाईट: www.marathisoyrik.in

???? आम्हाला फॉलो करा

???? फेसबुक: https://www.facebook.com/share/rWdY7FPZ5Ld8hbyZ/?mibextid=qi2Omg

???? इंस्टाग्राम: https://bit.ly/3qa7xzx

???? युट्युब: https://bit.ly/31HDF4j

????मराठा सोयरीक - विवाह जुळण्याचे एकमेव ठिकाण ! ????