अलिकडच्या वर्षांत, ग्रामीण महाराष्ट्राने सामाजिक आणि आर्थिक आव्हानांमुळे पारंपारिक विवाह पद्धतींमध्ये लक्षणीय बदल पाहिले आहेत. या परिवर्तनांचे उद्दिष्ट अधिक समावेशक, आश्वासक आणि शाश्वत विवाहपद्धती वाढवणे, समाजातील सर्वांचे कल्याण करणे हे आहे. सामाजिक सहाय्य प्रणालींचा अतिरेक केला जाऊ शकत नाही. मजबूत सामाजिक संबंध नवविवाहित जोडप्यांना आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आधार देतात. आपलेपणा आणि एकतेची भावना वाढवून ग्रामीण मराठी समाज टिकाऊ आणि परिपूर्ण आधुनिक विवाह पद्धती राबवू शकतात.
लग्नातील आर्थिक अडचणी दूर करणे हे आधुनिकीकरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विवाहाबाबतच्या वास्तववादी अपेक्षा निश्चित करून आणि लग्नसमारंभावरील होणार अवाढव्य खर्च नियंत्रित करून भव्य स्वरूपातील विवाह समारंभांसाठी निर्माण होणारा कर्जाचा बोजा टाळता येऊ शकतो. Read More
महाराष्ट्रात, मुलींमध्ये उशीरा विवाह होण्याच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण विवाह जुळणी प्रक्रियेदरम्यान दिले जाणारे 'सतत नकार' हे आहेत. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. चांगले स्थळ आले असताना मुलामध्ये दोष शोधणे हे एक मोठे कारण सर्रासपणे दिसून येते. त्यांच्या स्वतःमधील असलेल्या दोषांकडे कानाडोळा करत, अनेक तरुणींना व त्यांच्या पालकांना संभाव्य वरांमध्ये सतत दोष आढळतात, ज्यामुळे त्यांचे लग्न ठरण्यात विलंब होतो.
नकाराची कारणे:
स्वतःमध्ये कितीही दोष असले तरी चांगले स्थळ आले असताना काही ना काही दोष शोधून प्रत्येक वेळी नकार देणे, हे लग्न उशिरा होण्यामागचे मुख्य कारण आहे. विविध कारणामुळे विवाह प्रस्ताव नाकारले जातात. यामध्ये शिक्षण, पगार, कुटुंबाची आर्थिक व सामाजिक पत, सासू-सासऱ्यांचा स्वभाव, शेतजमिनीची मालकी, वराचा व्यवसाय, वयातील तफावत आRead More
महाराष्ट्रात, विवाहपद्धतींमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. मुलांचे लांबत चाललेले लग्नाचे वय आणि त्यांच्या आदर्श जोडीदाराबाबतच्या अवास्तव अपेक्षा यांसारखे आधुनिक मुद्दे समाजातील विवाहसंस्थेला आव्हान देत आहेत. तरुणमंडळी लग्न होण्याआधी आधी त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल विकासाला प्राधान्य देतात नंतर लग्नाचा विचार करतात. यामुळे तरुण-तरुणींना विवाहानंतर आपल्या भूमिका आणि अपेक्षांची समज असणे आवश्यक आहे.
वर किंवा वधू आणि त्यांचे पालक या दोघांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न झाल्यास पुढे जाऊन वैवाहिक तणाव वाढतात आणि घटस्फोट घडतात. उदाहरणार्थ, नवविवाहित जोडप्यांनी विशेषतः वधूने आपापल्या वैवाहिक कर्तव्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, त्यांच्या प्रोफेशनल महत्वाकांक्षांशी तडजोड करावी, अशी सहसा पालकांची अपेक्षा असते. अशा अपेक्षा �Read More
प्रश्न : सर, मी आठ वर्षे झाली व्यवसाय करतोय माझ्याकडे चार कंपन्यांची डीलरशिप आहे. नमकीन वॉटर, कोको ऑईल, चहा पावडर, लोडिंगसाठी गाडी सुध्दा आहे आणि आता हॉटेल पण चालू करतोय. पण लग्नासाठी कोणी मुलगीच देत नाही, या लोकांना नोकरी पाहिजे ती पण शहरात… काय करावे, काही कळत नाही, काही उपाय सांगा.
उत्तर : मित्रा, आपले दुर्दैव आहे, की समाजात मालकापेक्षाही नोकरास जास्त पत आहे. लोकांना आपल्या मुलींचे लग्न एखाद्या उद्योगाचा मालक असणार्या तरूणाशी नव्हे तर कंपन्यांमध्ये नोकरी करणार्या तरुणाशी लावायचे असते. तुझ्या यशाची जर समाजाला किंमत नसेल तर अशा समाजास किंमत देऊन काय फायदा? आणि शेवटी गुलामगिरी रक्तात असणार्या घरातील मुलगी करून काय फायदा? त्यामुळे तुमचाही वंश गुलामगिरीचाच होईल.
तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात समाज अजूनही वैचारिकदृष्ट्या मागासलेलाच आहे. पण आश्चर्य�Read More
१) मार्केट रिसर्च : गेले वर्षभर आम्ही रिसर्च करीत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून विवाहसंस्था, कार्यकर्ते, व्यक्ती, समाज शास्त्रज्ञ, अभ्यासक, कुटुंब, न्याय प्रक्रियेमधील तज्ञ तसेच विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिक यांना भेटून आम्ही त्या संदर्भात माहिती घेतली. हे संशोधन करीत असताना एक गंभीर बाब आम्हाला आढळली, ती आज मी या लेखात मांडत आहे.
२) मुलींचा भ्रमनिरास : बर्याच वेळा विवाह झाल्यानंतर वधू व तिच्या पालकांचा भ्रमनिरास झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली. लग्न ठरवताना वरपक्षाकडून दाखवलेली श्रीमंती, संपत्ती व वातावरण यांचा कृत्रिमरित्या देखावा किंवा बनाव केला जातो; परंतु विवाह झाल्यानंतर तसे काहीच नसल्याचे व आपली फार मोठी फसवणूक झाल्याचे कळून चुकते. म्हणजे ज्या अपेक्षेने विवाह केला त्या भंग झाल्या व खूप मोठा भ्रमनिरास झाला,Read More
मला भेटण्यासाठी एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन आले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवगीय होते. पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी - व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. गेले वर्षभर ते माझे उद्योजकताविषयक लेख वाचतात आणि आता माझ्याशी संपर्क साधून भेटण्यास आले होते. मी विचारले, "वर्षभरापूर्वी तुम्ही माझ्याकडे का नाही आलात'' तर म्हणाले, आम्ही विचार करत होतो.
जगामध्ये जे लोक यशस्वी आहेत, त्यांच्यात व अयशस्वी लोकांत शारीरिक, बौध्दिकदृष्ट्या कोणताही फरक नसतो; फरक असतो तो फक्त विचार करण्याच्या पध्दतीमध्ये. ओव्हर थिंकिंगमुळे त्या मुलीने आयुष्यातील उमेदीच्या काळात शिक्षण, नोकरी, व्यवसाय व विवाह अशा २० हून अधिक संधींवर पाणी सोडले होते. कधी नोकरीचे ठिकाण दूर आहे, तर कधी पगार कमी आहे म्हणून. कंपनी चांगली आहे का? व्यवसाय केला तर व्यवसायRead More
१) करियरपेक्षा लग्नाचं टेंशन : मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व तालुक्यात विविध कार्यक्रमासाठी जातो, त्यावेळी अनेक जणांची भेट होते किंवा बरेचजण आवर्जून भेटायला येतात. बरेच जण करियर व्यवसाय यासंबंधी मार्गदर्शन मिळवण्यासाठी भेट देतात, यातून मला प्रकर्षाने जाणवलं की करियरमध्ये किंवा व्यवसायामध्ये पैसे कमविण्यापेक्षा किंवा यश मिळवण्यापेक्षा विवाहाचंच टेंशन त्यांच्या मनात जास्त असतं, हे त्यांच्या पुरतच मर्यादित नसतं परंतु लग्नाबाबत कुटुंबिय व समाजाकडूनही वयात आल्यावर वारंवार त्याबद्दल दबाव टाकला जातो. चांगली नोकरी नाही केली तर मुलगी कोण देणार? अशा गोष्टीमुळे करियर बाबत गंभीर होण्यापेक्षा लग्नाबाबत अधिक विचार केला जातो, म्हणजे नोकरी/व्यवसाय करण्याचा मुख्य हेतु पैसे कमावणे, बचत करणे, स्थावर मालमत्ता कमावणे हा नसून लग्न ठरणे हा असतो, व त्या�Read More
१) इतिहास : ऐतिहासिक काळात पूर्वी पुरुष हे अनेक विवाह करायचे, काही वेळेस एका राज्याशी सुसंबंध प्रस्थापित करण्यासाठी दुसरा राजा हा त्या राज्याच्या राजकन्येशी विवाह करायचा. असे अनेक विवाह राजे करायचे. तसेच लढाईमध्ये खूप पुरुष मृत्यूमुखी पडायचे, त्यामुळे पुरुषांची संख्या महिलेच्या तुलनेत कमी असायची. त्यावेळी बहुविवाह पध्दत असायची तशाच इतरही प्रथा होत्या.
२) आधुनिक काळ : आधुनिक काळ येईपर्यंत त्या सर्व प्रथा हळूहळू बंद करण्यात आल्या, त्यावर कायदे व सुधारणा झाल्या. आता पूर्वीसारख्या लढाया होत नसल्याने पुरुष मृत्यूचे प्रमाण कमी आहे. लिंग गुणोत्तर हे जवळ जवळ समान होत आहे, आता बहुविवाह पध्दत राहिली नाही. पूर्वी कमी वयात मुलींची लग्ने व्हायची; त्यावेळी नवरा हा तिच्यापेक्षा दुप्पट/तिप्पट वयाचा असायचा. त्यामुळे त्याच्या मृत्युवेळी पत्नीचे वय तरुण अ�Read More