१) करियरपेक्षा लग्नाचं टेंशन : मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व तालुक्यात विविध कार्यक्रमासाठी जातो, त्यावेळी अनेक जणांची भेट होते किंवा बरेचजण आवर्जून भेटायला येतात. बरेच जण करियर व्यवसाय यासंबंधी मार्गदर्शन मिळवण्यासाठी भेट देतात, यातून मला प्रकर्षाने जाणवलं की करियरमध्ये किंवा व्यवसायामध्ये पैसे कमविण्यापेक्षा किंवा यश मिळवण्यापेक्षा विवाहाचंच टेंशन त्यांच्या मनात जास्त असतं, हे त्यांच्या पुरतच मर्यादित नसतं परंतु लग्नाबाबत कुटुंबिय व समाजाकडूनही वयात आल्यावर वारंवार त्याबद्दल दबाव टाकला जातो. चांगली नोकरी नाही केली तर मुलगी कोण देणार? अशा गोष्टीमुळे करियर बाबत गंभीर होण्यापेक्षा लग्नाबाबत अधिक विचार केला जातो, म्हणजे नोकरी/व्यवसाय करण्याचा मुख्य हेतु पैसे कमावणे, बचत करणे, स्थावर मालमत्ता कमावणे हा नसून लग्न ठरणे हा असतो, व त्याचेच जास्त टेंशन असल्याचे दिसून येते.
२) उद्योग आणि विवाह : मी अनेक उदाहरणे स्वत: पाहिली आहेत, जिथे शिक्षणसंपल्या नंतर, वयात आल्यानंतर तरुण मुलांवर विशेषत: वयात आलेल्या मुलांमुलींवर विवाहासाठी कुटुंबियांकडून व समाजाकडून दबाव टाकला जातो. मग मी व्यवसाय व विवाह दोन्ही बाबीत यशाचा सहसंबध आहे का, याचा विचार करणे सुरू केले. जगात सर्वाधिक उद्योजक/व्यवसायिक हे पाश्चात्य देशात असतात; परंतु तिकडे त्यांच्यावर विवाहासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो किंवा त्यांच्या मनात त्याबाबत तणावही नसतो, म्हणजे ठराविक वयातच विवाह केला पाहिजे, अरेंज मॅरेज करावे की प्रेम विवाह असं कोणत्याही प्रकारचे बंधन त्यांच्याकडे नाही. तरुण वयात अशा प्रकारचा कोणताही दबाव नसल्यामुळे ते आपापल्या उद्योग किंवा व्यवसायात पुर्णपणे लक्ष केंद्रीत करू शकतात. त्यामुळे जगातील उद्योजकांचे सर्वाधिक प्रमाण हे पाश्चात्य देशांत असते, तसेच देशातील उद्योग विश्वात वर्चस्व राखणारे समाज आहेत, त्यांच्यातील तरुण उद्योगातच करियर करणार असल्यामुळे त्यांच्यावर करियरमध्ये सेटल होण्याचा दबाव कमी वयात असताना नसतो. तसेच त्यांचे विवाह कमी वयात होतात. त्यामुळे विवाहाची चिंता त्याबाबत तणाव खूप कमी असतो, त्यामुळे व्यवसायात उतरल्यावर ते आपल्या व्यवसायाच्या भरभराटीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करतात आणि यशस्वी करतात; परंतु बाकी मराठी समाजात युवकांवर विवाहाचे अतिरिक्त दडपण असते. त्यामुळे आयुष्यात कोणत्याही करियर, व्यवसाय, उद्योगात यशस्वी होऊन पैसे कमावण्याबाबत कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत, उद्योगात आपली मराठी मुलं मागे असण्यामागे हे एक कारण आहे.
३) मराठी मुलांची स्थिती : बरीच मराठी मुलं नोकरीसाठी धावपळ करीत आहेत, बरीच वर्षे प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही. उमेदवारीचे वय निघून गेल्यावर व्यवसाय/उद्योग करायची अक्कल येते. त्यातही स्थिर स्थावर होत नाहीत, त्यासोबतच घरचे कुटुंबिय, नातेवाईक, समाज हे विवाहासाठी दबाव टाकत असतात. आम्हीही याबाबत संशोधन केले त्यात असे दिसून आले की महाराष्ट्रात वयाची पस्तीशी ओलांडलेल्या अविवाहित तरुणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
४) आपण काय करावे? : व्यवसाय क्षेत्रात एक प्रसिध्द म्हण आहे, जो दुसर्यांवर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला; आपल्याकडे विवाह निश्चितीमध्ये गावकी, भावकी, नातेवाईक हे महत्वाचे घटक असतात. या म्हणी प्रमाणेच समाजातही अशी स्थिती आहे की, "जो गावकी- भावकीवर विसंबला तो बिनलग्नाचा राहिला". जी तरुण मुलं गावकी, भावकी, नातेवाईक आपलं लग्न ठरवतील अशी मानसिकता घेऊन बसली आहेत, त्यांच्यासाठी कठीण काळ आहे. कारण सध्या लग्न निश्चिती करणे, लग्न ठरविणे हे आता त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर गेले आहे, त्यामुळे लग्नासाठी त्यांच्यावर पूर्णत: विसंबून राहणे योग्य नाही, जुन्या काळात चालत असे; परंतु आता काळ बदललाय त्यामुळे आज तरुण मुलांनी आपल्या विवाहासाठी स्वत:च करियर किंवा उद्योगात यशस्वी होण्यासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तयारी करावी लागेल, आपण ज्या क्षेत्रात काम/व्यवसाय करतो, त्या क्षेत्रात आपले नेटवर्क तयार करावे व आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असतानाच आपल्यासाठी सुयोग्य साथीदार निवडावा, त्याला जात-धर्म, गावकी, भावकी यांचे कोणतेही बंधन व दबाव नसावा. कॉलेजला असतानाच चांगली मैत्रीण करा, जिथे काम /व्यवसाय करता तिथे कोण छान समविचारी मिळते का बघा. सोशल मीडिया वर मैत्री करा. आवडली तर मैत्री घट्ट करा. इतकी घट्ट करा की योग्य वेळी प्रपोज केलं तर तिने 'होय' म्हणावे. तिचे 'होय' ओळखण्यासाठी कॉफी /कँडल लाईट डिनर /लॉन्ग ड्राइव्ह, इ. ला बोलवा. तिने वेळ दिला व विश्वास ठेवला की समजा 'होय' म्हणणार आहे. (ही माझी टेक्निक आहे. तुमच तुम्ही बघा.) कोणत्याही चीप वाटणाऱ्या ठिकाणी भेटू नये. पण हे लफडे नसावे, त्याला एक उच्च दर्जा असावा. नात्यातील पवित्रता असावी. मुलींनाही अविवाहित राहण्याची भीती असते, तुम्ही प्रपोज करा तुम्हाला होकार मिळेल. तुमचं लग्न ठरविण्याची समाजाची ऐपत संपली आहे हे लक्षात ठेवा, जो ८०% समाज स्वतः रेशनकार्डावर जगतोय तो तुमच काय भलं करणार? तुम्ही स्वतः कामाला लागा.
५) पालकांनो : मुलं-मुली मैत्री करत असतील तर करु द्या. आत्ताच इतकी वाईट स्थिती आहे, उद्या तुमच्याने लग्न ठरविणे होणार नाही. त्यांच त्यांना तरी करु द्या. त्यात वाहत जाणार नाहीत असे मजबूत संस्कार देणे तुमच काम आहे.
६) भावकी : एखाद्याने स्वतः विवाह केला तर भावकी नातेवाईकांनी विरोध करू नये, कारण जे तुम्हाला जमत नाही ते त्याने करून दाखवले. गावात शंभर पोरं पस्तिशीच्या पुढची आहेत, पहिल्यांदा त्यांची लग्न करून दाखवा. तरुण पिढी तुम्हाला आता भीक घालणार नाही हे लक्षात ठेवा आणि गप राव्हा.
महान अर्थतज्ज्ञ चाणक्य याच्या मते, "A man must give particularly careful consideration to marriage, for any decision taken in haste can ruin his life forever." एखाद्याने लग्नासाठी विशेषतः काळजीपूर्वक विचार केला पाहिजे कारण घाईत घेतलेला कोणताही निर्णय त्याचे आयुष्य कायमचा नाश करू शकतो.
मी ज्यांना गुरु मानतो असे महान शायर राहत इंदोरी म्हणतात, " मेरे बेटे तू इश्क जरूर कर, मगर हदसे गुजर जाने का नही। "
चुका व उपाय : आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरून याविषयावर अभ्यास करतोय, हा विषय किती उग्र आहे ह्याची कित्तेक लोकांना कल्पनाही नाही. प्रत्येक गावात सरासरी शंभर मुलं पस्तिशीच्या पुढे अविवाहित आहेत.
१) पहिली चूक फक्त नोकरी : मराठी मुलं व कुटुंब फक्त नोकरीं आणि नोकरीं याचाच विचार करतात. त्यामुळे नोकरी काय लागत नाही आणि लग्न काय होत नाही.
उपाय : नोकरी हा विषय डोक्यातून काढला पाहिजे. काही व्यवसाय करून लवकर कमवायला लागा. कुटुंब व समाजाने मानसिकता बदला. शेतकरी, व्यावसायिकाला मुलगी द्या.
२) बिना कौशल्याचे शिक्षण : बहुसंख्य मराठी मुलं कोणतंही कौशल्य नसणार शिक्षण घेतात त्यामुळे त्यावर आधारित कमाईला सुरवात करता येत नाही. कमाई नाही तर लग्न नाही.
उपाय : कौशल्य असलेले शिक्षण घ्या. ज्या आधारे तुम्हाला लगेंच महिना काही कमाई सुरु होईल. "BE सिविल बेकार व मिस्त्री कामविती पचास हजार" अशी आज अवस्था आहे.
३) पै-पाहुण्यांचा घोळ : आपल्या कडे भारी हलका कडू गोड पाव्हना असा प्रकार चालतो. त्यामुळे अनेकांची लग्न अडली आहेत.
उपाय : फक्त मुलगा मुलगी व्यवस्थित समजदार असणे एवढंच पहावे. पाव्हणं पै चा विचार सोडा.
४) अवास्तव अपेक्षा : मुलीच्या व कुटुंबाच्या अपेक्षा अवास्तव असतात त्यामुळे लग्न लांबतायत.
उपाय : परिस्थितीचे भान ठेवा. वास्तव वा माफक अपेक्षा ठेवा नाहीतर तुम्हाला सुद्धा बिनलग्नाचं रहावं लागेल. समुपदेशन गरजेचं आहे.
५) स्वेच्छा निवड : अनेक मुलं मुली आपला जीवन साथीदार स्वतः निवडतात पण कुटुंबाचा वा समाजाचे भीती पोटी बरेच जण लग्न करीत नाहीत.
उपाय : मुलांच्या स्वेच्छा निवडीचा कुटुंबाने विचार करावा, उगीच इगो मध्ये आणू नये. मुलांची निवड योग्य आहे का याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा. 'लव्ह बट अरेंज' ही पद्धती वाढली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःचा जीवन साथीदार निवडण्याची मुभा दिली मग तो आपल्याच जातीतला असो किंवा आंतरजातीय विवाह असो. फक्त मुलांनी निवडलेला साथीदार उच्च दर्जाचा, सुसंकृत आणि कर्तृत्ववान असावा. उदा. मुलगा/मुलगी आयएएस, आयपीएस यांसारख्या उच्च पदावर कार्यरत असतील किंवा करियर, उद्योगात यशस्वी असतील तर लग्नास परवानगी देण्यास काहीच हरकत नाही.
गावकी-भावकी, नातेवाईक हा विषय आता संपला आहे. म्हणून लग्न जमवण्यासाठी लगेच आम्हाला फोन करा. आम्ही संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने व आधुनिक विचारसरणीवर आधारित विवाह जुळविणारी संस्था आहोत. पदवीधर, उच्चशिक्षित, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक यांसाठी आमच्याकडे आहेत मराठा समाजातील हजारो विवाहयोग्य स्थळे आणि योग्य जोडीदार शोधण्याची खात्री !
मराठा समाजातील नोंदणीकृत विश्वसनीय विवाह संस्था
3500 हून अधिक यशस्वी लग्न जुळवलेत
संपूर्ण महाराष्ट्रातून स्थळे
आपल्या सोयीप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन जुळणीची सुविधा
आपल्या आवडी-निवडींच्या आधारे जोडीदारांची निवड
सर्वांसाठी आकर्षक पॅकेजेस
काऊन्सेलिंग सेवा
तुमच्या स्वप्नातील जोडीदाराची निवड करा, आणि सुंदर भविष्याची सुरुवात करा !
नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
मराठा सोयरीक संस्था
संपर्क कार्यालय : वैष्णवी कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, जगदंब क्लॉथ समोर, पाईपलाईन रोड. अहिल्यानगर (अ.नगर )- ४१४००१
संपर्क: 7447785910, 8847724680
पुणे शाखा : कान्हूर पठार पतसंस्थेच्या वर, पुणे-नगर हायवे टच, चंदननगर, पुणे.
संपर्क क्रमांक: 7020281282
वेबसाईट: www.marathisoyrik.in
आम्हाला फॉलो करा
फेसबुक: https://www.facebook.com/share/rWdY7FPZ5Ld8hbyZ/?mibextid=qi2Omg
इंस्टाग्राम: https://bit.ly/3qa7xzx
युट्युब: https://bit.ly/31HDF4j
मराठा सोयरीक - विवाह जुळण्याचे एकमेव ठिकाण !