एका अविवाहित व्यावसायिकाचा प्रश्न आणि उत्तर
प्रश्न : सर, मी आठ वर्षे झाली व्यवसाय करतोय माझ्याकडे चार कंपन्यांची डीलरशिप आहे. नमकीन वॉटर, कोको ऑईल, चहा पावडर, लोडिंगसाठी गाडी सुध्दा आहे आणि आता हॉटेल पण चालू करतोय. पण लग्नासाठी कोणी मुलगीच देत नाही, या लोकांना नोकरी पाहिजे ती पण शहरात… काय करावे, काही कळत नाही, काही उपाय सांगा.
उत्तर : मित्रा, आपले दुर्दैव आहे, की समाजात मालकापेक्षाही नोकरास जास्त पत आहे. लोकांना आपल्या मुलींचे लग्न एखाद्या उद्योगाचा मालक असणार्या तरूणाशी नव्हे तर कंपन्यांमध्ये नोकरी करणार्या तरुणाशी लावायचे असते. तुझ्या यशाची जर समाजाला किंमत नसेल तर अशा समाजास किंमत देऊन काय फायदा? आणि शेवटी गुलामगिरी रक्तात असणार्या घरातील मुलगी करून काय फायदा? त्यामुळे तुमचाही वंश गुलामगिरीचाच होईल.
तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात समाज अजूनही वैचारिकदृष्ट्या मागासलेलाच आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे आपल्याकडे आपला मुलगा/ जावई /पती हा कुणाकडे तरी नोकरी करणारा असावा असे वाटते आणि तसाच जावई शोध सुरू असतो. आपल्याकडे उद्योगाबाबत संभ्रम आधीपासूनच आहेत. उद्योग जगतात कायम रिस्क असतात. त्यात चढउतार येत असतात. त्यामुळे जोखीम युक्त व्यावसायिकापेक्षा चांगला सुरक्षित नोकरदार बरा अशी पालकांची मानसिकता असते. एखादा व्यवसायिक महिना ५० ते ६० हजार कमवत असेल तर त्याच्यापेक्षा २०००० रुपये कमावणार्या नोकरदाराला प्रथम पसंती दिली जाते. जणू काय त्यांनी उद्योग केला हे महापापच केले.
आजचा समाज हा आतून पूर्ण पोकळ होऊन भुसा झालाय. तुम्ही लग्नासाठी विचारल्यावर नकार येतोय. तेच तुम्ही बोकडाच्या मटनाचे जेवण ठेवा, कधीच खायला न मिळाल्यासारखे शंभर लोक जेवायला येतील. अशा भुक्कड समाजातील मुलगीच कशाला? ज्या समाजात होणारा नवरा नोकरी करणाराच हवा असे विचार असतील, त्या समाजात बिझनेसमन नव्हे तर नोकर व गुलामच तयार होतील. त्यापेक्षा तुमच्या विचारांना तुमच्या व्यवसायाला स्वीकारणार्या समविचारी मुलींशी विवाह केलेला बरा. मग ती कोणत्याही समाजाची असो.
लेखक: डॉ. प्रकाश भोसले
आम्ही तुम्हाला तुमचा आदर्श जोडीदार शोधण्यात सहाय्य करू. आम्ही संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने व आधुनिक विचारसरणीवर आधारित विवाह जुळविणारी संस्था आहोत. पदवीधर, उच्चशिक्षित, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक यांसाठी आमच्याकडे आहेत मराठा समाजातील हजारो विवाहयोग्य स्थळे आणि योग्य जोडीदार शोधण्याची खात्री !
मराठा समाजातील नोंदणीकृत विश्वसनीय विवाह संस्था
3500 हून अधिक यशस्वी लग्न जुळवलेत
संपूर्ण महाराष्ट्रातून स्थळे
आपल्या सोयीप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन जुळणीची सुविधा
आपल्या आवडी-निवडींच्या आधारे जोडीदारांची निवड
सर्वांसाठी आकर्षक पॅकेजेस
काऊन्सेलिंग सेवा
तुमच्या स्वप्नातील जोडीदाराची निवड करा, आणि सुंदर भविष्याची सुरुवात करा !
नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
मराठा सोयरीक संस्था
संपर्क कार्यालय : वैष्णवी कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, जगदंब क्लॉथ समोर, पाईपलाईन रोड. अहिल्यानगर (अ.नगर )- ४१४००१
संपर्क: 7447785910, 8847724680
पुणे शाखा : कान्हूर पठार पतसंस्थेच्या वर, पुणे-नगर हायवे टच, चंदननगर, पुणे.
संपर्क क्रमांक: 7020281282
वेबसाईट: www.marathisoyrik.in
आम्हाला फॉलो करा
फेसबुक: https://www.facebook.com/share/rWdY7FPZ5Ld8hbyZ/?mibextid=qi2Omg
इंस्टाग्राम: https://bit.ly/3qa7xzx
युट्युब: https://bit.ly/31HDF4j
मराठा सोयरीक - विवाह जुळण्याचे एकमेव ठिकाण !