मला भेटण्यासाठी एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन आले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवगीय होते. पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी - व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. गेले वर्षभर ते माझे उद्योजकताविषयक लेख वाचतात आणि आता माझ्याशी संपर्क साधून भेटण्यास आले होते. मी विचारले, "वर्षभरापूर्वी तुम्ही माझ्याकडे का नाही आलात'' तर म्हणाले, आम्ही विचार करत होतो.
जगामध्ये जे लोक यशस्वी आहेत, त्यांच्यात व अयशस्वी लोकांत शारीरिक, बौध्दिकदृष्ट्या कोणताही फरक नसतो; फरक असतो तो फक्त विचार करण्याच्या पध्दतीमध्ये. ओव्हर थिंकिंगमुळे त्या मुलीने आयुष्यातील उमेदीच्या काळात शिक्षण, नोकरी, व्यवसाय व विवाह अशा २० हून अधिक संधींवर पाणी सोडले होते. कधी नोकरीचे ठिकाण दूर आहे, तर कधी पगार कमी आहे म्हणून. कंपनी चांगली आहे का? व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा होईल का? व्यवसाय सेट झाल्यावर, लग्न झाल्यानंतर काय उपयोग? सासरचे चांगले असतील का? मुलगा थोडा सावळाच आहे... उंची बसत नाही... आई वडील वयस्कर आहेत... ननंद जरा भांडखोर दिसते... असे काहीही अतिविचारी व वेडपट विचार असल्यामुळे आज ३२ वय झाले, तरी तिचे लग्न झाले नव्हते. आता संपूर्ण कुटुंबालाच वेड लागायची वेळ येऊन ठेपली आहे.
ज्यांना कुणाला असा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे, तो लवकर ओळखा; कारण हा पूर्ण आयुष्य बरबाद करणारा खतरनाक विषाणू आहे. याची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे कोणत्याही गोष्टीला अनेक फाटे फोडणे, प्रत्येक गोष्टीला सारखे सारखे इतरांना मत विचारणे व त्यावर पुन्हा पुन्हा विचार करणे, नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करणे. याचे दुष्परिणाम म्हणजे कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत न पोहचणे, त्यामुळे कोणतीही ॲक्शन न घेणे, अतिविचाराने सोप्या गोष्टी उगीचच अवघड करणे, सतत भीतीच्या भावनेत राहणे, आत्मविश्वास कमी कमी होत जाणे, डिप्रेशन वाढणे, शारीरिक थकवा वाढणे आणि हे अतिप्रमाणात व सतत काही महिने होत राहिल्यास जीवन निरुत्साही होऊन मानसिक रोग होण्याचीही शक्‍यता असते.
ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, त्याने अतिविचाराच्या रोगापासून दूर रहावे. जे काही करायचं आहे, त्याचा थोडाच विचार करा, वेळीच योग्य निर्णय घ्या, झटपट कामाला लागा. हातात काम असेल, तर विचार करायला वेळ मिळत नाही. विचारच करत राहिला की, हाताला काहीही मिळत नाही, मग आयुष्यभर सुशिक्षित बेकार' हा शिक्का कायम राहतो. त्यामुळे अतिविचार करणे टाळा. काय तो लवकर निर्णय घ्या, ठरवा आणि कामाला लागा. स्वत:चे व इतरांचे डोके खाऊ नका. नाहीतर आयुष्यभर बेकारी व अविवाहितपणा तुमच्या नशिबी नक्कीच आहे. म्हणून रतन टाटा म्हणतात, "निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे, हे सुध्दा कधीकधी अधिक योग्य ठरते. मी आधी निर्णय घेतो, मग तो खरा ठरवतो.
लेखक: डॉ. प्रकाश भोसले
आदर्श जोडीदाराची वाट पाहत राहिल्यास अनेक चांगल्या संधी निघून जाऊ शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला तुमचा आदर्श जोडीदार शोधण्यात सहाय्य करू.म्हणून लग्न जमवण्यासाठी लगेच आम्हाला फोन करा. आम्ही संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने व आधुनिक विचारसरणीवर आधारित विवाह जुळविणारी संस्था आहोत.पदवीधर,उच्चशिक्षित,डॉक्टर,इंजिनिअर,व्यावसायिक यांसाठी आमच्याकडे आहेत मराठा समाजातील हजारो विवाहयोग्य स्थळे आणि योग्य जोडीदार शोधण्याची खात्री

मराठा समाजातील नोंदणीकृत विश्वसनीय विवाह संस्था

3500हून अधिक यशस्वी लग्न जुळवलेत

संपूर्ण महाराष्ट्रातून स्थळे

आपल्या सोयीप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन जुळणीची सुविधा

आपल्या आवडी-निवडींच्या आधारे जोडीदारांची निवड

सर्वांसाठी आकर्षक पॅकेजेस

काऊन्सेलिंग सेवा

तुमच्या स्वप्नातील जोडीदाराची निवड करा, आणि सुंदर भविष्याची सुरुवात करा

नोंदणीसाठी आजच संपर्क करा:

मराठा सोयरीक संस्था

 संपर्क कार्यालय : वैष्णवी कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, जगदंब क्लॉथ समोर, पाईपलाईन रोड. अहिल्यानगर (अ.नगर )- ४१४००१

संपर्क: 7447785910, 8847724680

पुणे शाखा : कान्हूर पठार पतसंस्थेच्या वर, पुणे-नगर हायवे टच, चंदननगर, पुणे.

संपर्क क्रमांक: 7020281282

 वेबसाईट: www.marathisoyrik.in

 आम्हाला फॉलो करा

 फेसबुक: https://www.facebook.com/share/rWdY7FPZ5Ld8hbyZ/?mibextid=qi2Omg

 इंस्टाग्राम: https://bit.ly/3qa7xzx

 युट्युब: https://bit.ly/31HDF4j

मराठा सोयरीक - विवाह जुळण्याचे एकमेव ठिकाण !