विवाहपूर्व समुपदेशन - फॅड नव्हे, तर काळाची गरज
महाराष्ट्रात, विवाहपद्धतींमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. मुलांचे लांबत चाललेले लग्नाचे वय आणि त्यांच्या आदर्श जोडीदाराबाबतच्या अवास्तव अपेक्षा यांसारखे आधुनिक मुद्दे समाजातील विवाहसंस्थेला आव्हान देत आहेत. तरुणमंडळी लग्न होण्याआधी आधी त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल विकासाला प्राधान्य देतात नंतर लग्नाचा विचार करतात. यामुळे तरुण-तरुणींना विवाहानंतर आपल्या भूमिका आणि अपेक्षांची समज असणे आवश्यक आहे.
वर किंवा वधू आणि त्यांचे पालक या दोघांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न झाल्यास पुढे जाऊन वैवाहिक तणाव वाढतात आणि घटस्फोट घडतात. उदाहरणार्थ, नवविवाहित जोडप्यांनी विशेषतः वधूने आपापल्या वैवाहिक कर्तव्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, त्यांच्या प्रोफेशनल महत्वाकांक्षांशी तडजोड करावी, अशी सहसा पालकांची अपेक्षा असते. अशा अपेक्षा तरुणाईच्या आधुनिक मूल्यांशी टक्कर देतात तेव्हा संघर्ष निर्माण होतो. आजकालची तरुण मंडळी प्रेम, प्रामाणिकपणा आणि पार्टनरशिप अशा आधुनिक संकल्पना मनात ठेवून विवाह करतात. परंतु जेव्हा विवाहानंतर या अपेक्षा खोट्या ठरू लागतात आणि वेगळी वास्तविकता समोर येते, तेव्हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटून वादविवाद, कलह सुरु होऊन प्रकरणे घटस्फोटांपर्यंत जातात.
आर्थिक दबाव असल्यास ही स्थिती आणखी गुंतागुंतीची होते. महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारीच्या चक्रात अडकले आहेत, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना मुलगी देण्यास बहुतांश पालक नकार देतात. कृषी पार्श्वभूमी असलेल्यांना कुटुंबांनादेखील मुलांचे विवाह ठरविताना आर्थिक अडचणींमुळे समस्यांचा सामना करावा लागतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातील व्यावसायिकांपेक्षा सामाजिक प्राधान्य हे आणखी एक आव्हान आहे. व्यावसायिकांकडे उच्च कमाईची क्षमता असूनही, समाजात जोखीम युक्त व्यावसायिकापेक्षा चांगला सुरक्षित नोकरदार बरा अशी पालकांची मानसिकता असते. समाजात असे विचार असतील, त्या समाजात गुलामच तयार होतील.
या सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन हे एक महत्त्वाचे साधन आहे. तज्ज्ञ समुपदेशकांकडून आर्थिक नियोजन आणि मुक्त संवाद यांद्वारे या आर्थिक आव्हानांवर तोडगा काढता येतो. विवाहपूर्व समुपदेशन जोडप्यांना विवाहाच्या वास्तविकतेचे दर्शन घडवून देते, अपेक्षा वास्तविक करण्यात मदत करते आणि प्रभावी संवाद कौशल्ये वाढवते. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन हीच काळाची गरज आहे, कारण ते समकालीन आव्हानांना संबोधित करताना परंपरांचादेखील आदर करते.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व समजण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. विवाहपूर्व समुपदेशनाला चालना देण्यासाठी आणि विवाह-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व समाजांत उपक्रम राबवले गेले पाहिजेत. समाजांतर्गत असे उपक्रम राबवल्यास तरुणांचे योग्य वयात विवाह, यशस्वी विवाहजुळण्या आणि एकूणच सामाजिक कल्याणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
लेखक: डॉ. प्रकाश भोसले
-------------------------------------
आम्ही तुम्हाला तुमचा आदर्श जोडीदार शोधण्यात सहाय्य करू. म्हणून लग्न जमवण्यासाठी लगेच आम्हाला फोन करा. आम्ही संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने व आधुनिक विचारसरणीवर आधारित विवाह जुळविणारी संस्था आहोत. पदवीधर, उच्चशिक्षित, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक यांसाठी आमच्याकडे आहेत मराठा समाजातील हजारो विवाहयोग्य स्थळे आणि योग्य जोडीदार शोधण्याची खात्री !
तुमच्या स्वप्नातील जोडीदाराची निवड करा, आणि सुंदर भविष्याची सुरुवात करा !
नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
मराठा सोयरीक संस्था
संपर्क कार्यालय: वैष्णवी कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, जगदंब क्लॉथ समोर, पाईपलाईन रोड. अहिल्यानगर (अ.नगर )- ४१४००१
संपर्क क्रमांक: 8847724680
पुणे शाखा: कान्हूर पठार पतसंस्थेच्या वर, पुणे-नगर हायवे टच, चंदननगर, पुणे.
संपर्क क्रमांक: 7020281282
मुंबई संपर्क क्रमांक: 7447785910
मराठा सोयरीक - विवाह जुळण्याचे एकमेव ठिकाण !